पुणे – खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील फरार आरोपीस स्वारगेट पोलिसांनी अटक केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी तब्बल एक महिना फरार होता. शाहरुख अजीज शेख(27,रा.गुलटेकडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस शिपाई ज्ञाना बडे, मनोज भोकरे व फिरोज शेख यांना खबर मिळाली की, खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात एक महिन्या पासून पाहिजे असलेला आरोपी हा मीनाताईठाकरे वसाहत गुलटेकडी या ठिकाणी आला आहे. त्यानूसार त्यास ताब्यात घेवुन अधिक चौकशी करता त्याने केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक अशोक येवले, तुषार भोसले पोलिस अंमलदार कुंभार, धावरे, शेख खेदांड, दळवी, तितमे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, गोडसे साळवे, वाबळे, सरक खोमणे यांच्या पथकाने केली आहे.