‘भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका …’ अजित पवार गटाच्या या नेत्याची जाहीर कबुली

Lok Sabha Election 2024 । २०२४ च्या लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहे. 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदानासह मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. तर ४ जूनला लोकसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजपने ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला होता. तसेच राज्यात महायुतीचे नेते आपल्याच सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचे दावे करतांना दिसत आहे. मात्र अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ म्हणाले,’या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला होता. मात्र,’या घोषणेमुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं’ अशी कबुली भुजबळ यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले,’४०० पार’च्या घोषणेमुळे एनडीएचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळ म्हणाले, “एनडीए ४०० पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकी नऊ आले होते. असेही ते म्हणाले आहे.
भुजबळ यांनी मित्रपक्षांचा उल्लेखात करत सांगितले की,’भाजपाच्या ४०० पार घोषणेमुळे भाजपासह मित्रपक्षांसमोर निवडणुकीच्या प्रचारात मोठं आव्हान निर्माण झालं होतं” असेही भुजबळ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर आता भाजप नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.





