Lok Sabha Election 2024 । देशातील अनेक भागात दुष्काळाचे मोठे संकट दिसून येत आहे. काही राज्यात तर दुष्काळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे अशात आता भाजप नेत्याचे विधान चर्चेत आले आहे.
राजस्थानमध्ये कडाक्याच्या उष्णतेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक शहरांतील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे जलमंत्री कन्हैया लाल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील जनतेला पाण्याचा विनाकारण अपव्यय करू नका आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा. असे आवाहन केले आहे.
कन्हैयालाल चौधरी म्हणाले की, ‘राजस्थानमधील 50 टक्के जिल्हे असे आहेत की जेथे पहिल्या 48 तासांत पाणी यायचे. आता 72 तासात ते तिथे पोहोचत आहे, ज्या पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाचे प्रमाण 23 टक्क्यांनी कमी झाले आहे. पाण्याचा वापर 35 टक्क्यांनी वाढला आहे. उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे.’
कन्हैया लाल चौधरी पुढे म्हणाले की, ‘आम्ही लोकांच्या समस्यांवर 80 टक्के काम केले आहे. पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी पाणीपुरवठ्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. ते पुढे म्हणाले, ‘यावेळी पाऊस थोडा लवकर यावा, अशी देवाकडे प्रार्थना करूया. गेल्या वेळी तापमान 35 ते 42 अंशांच्या आसपास होते. यावेळी तापमान 45 ते 50 अंशांच्या आसपास असल्याने येत्या काही दिवसांत पाण्याची समस्या आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.’
कन्हैया लाल चौधरी यांनी पाण्याच्या मुद्द्यावर बोलतांना वादग्रस्त वक्तव्य केले की,‘मी फुक मारुन पाणी घेऊन येऊ, वा हनुमानसारखं लागलीच पाणी आणू, असं शक्य नाही’, असे विधान त्यांनी केले. जितके पाणी आहे, तितका पुरवठा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. लोकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले. या दरम्यानचा त्यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून या वादग्रस्त विधानावरून विरोधकही त्यांच्यावर टीका करत आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये भीषण उष्मा कायम आहे. रविवारी उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला. सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ.रविप्रकाश माथूर यांनी याला दुजोरा दिला आहे. सोमवारी फलोदी येथे ४९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली, जी सामान्यपेक्षा ६.३ अंश सेल्सिअस जास्त आहे. बारमेरमध्ये ४९.३ अंश, जैसलमेर ४८.७ अंश, पिलानी ४८.५ अंश, करौली ४८.४ अंश, गंगानगर ४८.३ अंश, बिकानेर-कोटा-फतेहपूर ४८.२ अंश, ढोलपूर ४८.१ अंश आणि चुरूस ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
यासोबतच अंता येथे ४७.५ अंश, जोधपूर-भिलवाडा येथे ४७.४ अंश, चित्तौडगडमध्ये ४७ अंश, जालोरमध्ये ४६.७ अंश, संगरियात ४६.६ अंश, राजधानी जयपूरमध्ये ४६.४ अंश, अजमेरमध्ये ४६.३ अंश, सीएसकरमध्ये ४५ अंश, ४५.४५ अंश तापमान होते. दाबोक, उदयपूर येथे अंश सेल्सिअसची नोंद झाली.
हे वाचाल का ? ठाकरे गटाचा मोदींना खोचक टोला,’मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण…’