विधानसभेतील जागा वाटपावरील भुजबळांच्या विधानावर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले “भाजप सर्वात…”

Devendra Fadnavis On Chhagan Bhujbal | लोकसभा निवडणूकानंतर लगेच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सोमवारी मुंबईत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या सभेदरम्यान अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीकडून मिळणाऱ्या जागा वाटपाबाबत मोठे विधान केले होते.
“लोकसभेत जो खटाटोप करावा लागला, तो विधानसभेत होता कामा नये, विधानसभेत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत,” असे छगन भुजबळ यांनी म्हटले. भुजबळ यांच्या विधानावर भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? Devendra Fadnavis On Chhagan Bhujbal |
फडणवीस म्हणाले, “विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येतील आणि योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील. निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहे त्यांचा पूर्ण सन्मान यामध्ये राखला जाईल,” असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा Devendra Fadnavis On Chhagan Bhujbal |
तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नितीन गडकरींना पराभूत करण्यासाठी मोदी, शाह आणि फडणवीस एकत्रित प्रयत्न करत असल्याचे ‘सामना’ मध्ये लिहिले होते. त्याबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले की, “जे लोक गांजाचे सेवन करून लेख लिहितात त्यांच्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही, तरीही संजय राऊत यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत,” असा सल्ला फडणविसांनी राऊतांना दिला.
पुढे फडणवीस म्हणाले की, “येत्या ४ तारखेला अभूतपूर्व यश मिळणार आहे आणि मोदी पंतप्रधान होणार आहे. शपथविधी ते कधी घेतील हे मी नाही सांगू शकतं पण निश्चितपणे मोदीजी देशाचे पंतप्रधान होणार आहे,” असाही दावा फडणविसांनी केला.
हेही वाचा:
टेकऑफच्या पूर्वी इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले





