पुणे,दि.26- तक्रार मागे न घेतल्याने तक्रारदाराच्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना काळेपडळ येथे रविवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी डब्ल्युसिंग पंजाबसिंग टाक(31,रा.हडपसर) याच्यासह त्याच्या साथीदारांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी राजु माने (53,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) यांचा मुलगा कुंदन याच्यावर तलवारीने वार करुन आरोपींनी सोन्याची चेन चोरली होती. याप्रकरणी कुंदनने आरोपींविरुध्द तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घे म्हणत आरोपींनी राजु यांच्या तोंडावर हाताने मारहाण करत शिवगाळ केली. यानंतर यातील एकाने लोखंडी कोयता त्यांच्या डोक्यात मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.