Pune Crime: 3 महिन्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी आईला अटक; खुनाचे कारण उघड

पुणे – अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन महिन्याच्या मुलीचा आईनेच मुलाच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना येरवाड्यात उघडकीस आली आहे. त्यानंतर १४ वर्षीय मुलाने तिला पिशवीत घालून नदीपात्रात फेकून दिले. प्रतीक्षा (वय ३ महिने, नाव बदलेले आहे) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मूळची बुलढाणा जिल्ह्यातील असून १६ वर्षपूर्वी तिचे कर्नाटक राज्यातील तरुणासोबत लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा झाला असून त्याचे वय १४ वर्ष आहे. काही महिन्यापूर्वी तिचा घटस्फोट झाला होता.

त्यानंतर ती मुलासोबत येरवाड्यात आली असता एकासोबत महिलेची ओळख झाली. ओळखीतून ते दोघेही एकत्र राहत असताना अनैतिक संबंधातून त्यांना मुलगी झाली. दरम्यान, समाजामध्ये बदनामी होईल, मुलीचे वडील कोण अशी विचारणा झाल्यावर काय उत्तरे द्यायची अशी चिंता महिलेला होती. त्यामुळे २२ ऑक्टोबरला तिने चिमुरडीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलीला पिशवीत घालून तिला नदीपात्रात फेकण्यास मुलाला सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.