पुणे – क्रिकेटमध्ये 40 वर्षांपेक्षा अधिक काळ खेळाडूंना मार्गदर्शन करून विभागीय, आंतरविद्यापीठ, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविणारे ज्येष्ठ क्रिकेट मार्गदर्शक अरविंद शिवले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते शिवले यांना जीवनगौरव प्रदान करण्यात आला. नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय पुणे आणि नेस वाडिया महाविद्यालयाचे माजी क्रिकेट खेळाडू यांच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी रियाज बागवान, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ. मनोहर सानप, माजी क्रिकेटपटू निकी सलढाणा, अनिता शिवले, नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य वृषाली रणधीर, उपप्राचार्य प्रकाश चौधरी यावेळी उपस्थित होते.