पुणे – कोंढवा परिसरात दहशत निर्माण केलेल्या गुंड अक्रम पठाण व त्याच्या टोळीतील चौघांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख अक्रम गुलाब पठाण (25), महंमद सोहेल आझम पंजाबी (21), मझहर इस्माईल शेख (26 ) आझम अख्तर पंजाबी (23) आणि अख्तर उर्फ लड्डू इस्माईल शेख ( सर्व रा. कोंढवा) अशी मोक्का लागलेल्यांची नावे आहेत.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, खंडणी, हप्ता गोळा करणे, खुनाचा प्रयत्न, मारामारी, घातक शस्त्र बाळगल्याचे व तत्सम गंभीर स्वरूपाचे गुन्हे या टोळीविरुद्ध दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्यांच्याविरुद्ध “मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव स्थानिक पोलीस ठाण्याने पाठवला होता. पोलीस आयुक्त आमिताभ गुप्ता यांनी त्यास मंजुरी दिली. शहरात गेल्या वर्षभरात 59 टोळ्यांविरुद्ध या स्वरुपाची कारवाई केली आहे.