पुणे – बंडगार्डन पोलिसांनी मोबाईल फोनची जबरी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचे एकूण 70 अँड्राईड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. टोळीतील पाच आरोपींना अटक करुन दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांच्या हाती प्रथमच मोबाईल चोरांच्या टोळीतील दुसऱ्या साखळीतील गुन्हेगार हाती लागले आहेत. हे गुन्हेगार प्रत्यक्षात मोबाईल हिसकावणाऱ्या गुन्हेगारांकडून मोबाईल विकत घेत होते. यानंतर हे मोबाईल परराज्यात विक्रीसाठी पाठवले जात होते.
विकास वाधेरे (22 रा. अशोकनगर येरवडा पुणे ), अनिकेत लक्ष्मण कांबळे (20 रा. येरवडा पुणे) , एलिसन विल्सन पिल्ले, (19, रा. भास्त्रीनगर, घोरपडी गाव, पुणे ), तेजस गुलाब बाटे (27, रा. किरकिटवाडी, सिंहगड रोड, पुणे ) आणि निखील रामा पुजारी (28, रा. घोरपडी गाव, डोबरवाडी पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रशांत मधुकर नेवे (रा. गडकरीनगर, आवाहन प्रेस रिंगरोड भुसावळ गाव) यांचा मुलगा गौरद हा पुणे शहरामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. चार फेब्रुवारी रोजी प्रशांत नवे त्यांचा मुलगा गौरव नये असे दोघे भुसावळ वरुन रेल्वेने सकाळी 3. वाजता पुणे स्टेशन येथे आले होते. त्यांना त्यांचे नातेवाईकाकडे हडपसर येथे जायचे असल्याने त्यांचा मुलगा गौरव नेवे हा अलंकार थिएटर चौकात थांबुन मोबाईल फोनवरून ओला कैब बुक करत होता. त्याच वेळी मोटार सायकल वरून आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरूला होता. या तक्रारी वरुन दोन अज्ञात इसमाचे विरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले आरोपी अगोदर दाखल असलेल्या गुन्हयांच्या वर्णनाशी मिळते जुळते होते. पुणे स्टेशन परिसरातील घडलेल्या गुन्हयांचा सखोल तपास करून पोलीस अंगलदार सागर घोरपडे यांना मिळालेल्या माहितीवरुन विकास वाधेर आणि अनिकेत लक्ष्मण कांबळे यांना त्यांचे मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यांना अटक करून त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी तक्रारदार नेवे यांचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांचेकडे अधिक तपास करता मोबाईल फोनची जबरी चोरी करणारे त्यांचे साथीदार एलिसन विल्सन पिल्ले आणि तेजस गुलाब बाटे आणि निखील रामा पुजारी यांनाही गुन्हयामध्ये अटक करून चोरीचे एकुण 20 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
दुसऱ्या साखळीतील गुन्हेगाराचा मिळाला माग
पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरी करीत असत . चोरी केलेले मोबाईल फोन डोबरवाडी, घोरपडी येथील आरोपी निखिल रामा पुजारी याचेकडे दिले नंतर तो त्याचा साथीदार शिवा लक्ष्मण पुजारी( रा. डोवरवाडी ) यास विकत असल्याचे समजले. शिवा पुजारी हा चोरीचे मोबाईल फोन हे गुजरात राज्यातील कासिम या व्यक्तीचे सांगणे वरुन वेगवेगळ्या कुरीयर सर्व्हिसद्वारे मुंबई, अहमदाबाद, कोलकता, पश्चिम बंगाल राज्यात त्यांचे हस्तकांकडे पाठवित असल्याची माहिती सांगितली. या माहितीवरुण दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजता आरोपी शिवा पुजारी यास हडपसर येथुन एका लॉजवरून ताब्यात घेतले . त्याला पोलीसी खाक्या दाखवला असता, चोरीचे मोबाईल फोन कुरीयरद्वारे मुंबई येथे एका मालवाहुन टेंपोने पाठविले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी टेपोचा पाठलाग करुन टेंपोतील चोरीचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने एकुण पंधरा लाख रुपये किमतींचे मोबाईल आरोपीचेकडुन जप्त केले आहेत.
सदरची कार्यवाही अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील , सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर , पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल पवार, अंमलदार मोहन का प्रताप गायकवाड, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, सचिन भिंगारदिवे, अमोल सरडे, संजय वणवे, सागर घोरपडे, तळेकर, अंकुश खानसोळे यांनी केली आहे. पुणे शहरातील मोबाईल चोरी संदर्भात नागरीकांनी बंडगार्डन पोलीस स्टे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.