पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.
विनोद अशोक चेडे (वय २६, आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
खंडणी विरोधी पथक कात्रज घाटात गस्त घालत होते. त्यावेळी एक तरुण तेथे थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सचिन अहिवळे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून चेडेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चेडेविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, सचिन अहिवळे, प्रदीप शितोळे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, सुधीर इंगळे, पवन भोसले, संग्राम शिनगारे यांनी ही कारवाई केली.