पुणे जिल्हा: बारामतीत रस्ते सुरक्षा व मतदान जनजागृती अभियान

बारामती – अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी रस्ते सुरक्षा अभियान व मतदान जनजागृती अभियान राबविले होते. या अभियानात १७५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा व मतदान जनजागृती यावर आधारित घोषणा दिल्या. तसेच मतदान जनजागृती व रस्ते सुरक्षा या दोन विषयांवर वेगवेगळ्या पथनाट्यांचे सादरीकरण केले.
या अभियानात बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, सहाय्यक मोटार निरीक्षक सुरज पाटील, नायब तहसीलदार विलास करे, समाज कल्याण अधिकारी खारतोड यांनी पथ फेरीला संबोधित केले. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), रजिस्टार अभिनंदन शाह, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर, डॉ. योगिनी मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास कर्डिले, कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रकांत कांबळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. निरंजन शहा यांनी हे अभियान राबविले होते.
बारामती उपनगरातील ‘शितल ड्राईव्हींग स्कुल’च्या शितल कोठारी यानी स्वंयसेवकाचे कौतुक करून सन्मानमचिन्ह देऊन सन्मानित केले.





