पुणे – सदनिका भाडेतत्वावर देण्याची जाहीरात संकेतस्थळावर दिल्यानंतर लष्करी आधिकारी असल्याची बतावणी करणाºया चोरट्याने सदनिका व्यवहारात ५० हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.
सुबोध लोणकर (वय २४, रा. धानोरी) यांनी यासंदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणकर यांच्या वडिलांची कळस भागात सदनिका आहे. सदनिका भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात लोणकर यांनी एका संकेतस्थळावर टाकली होती. त्यानंतर चोरट्याने लोणकर यांच्या आईच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.
लष्करात आधिकारी असल्याची बतावणी चोरट्याने केले. पुण्यात नेमणूक झाली असून विश्रांतवाडी भागात सदनिका भाडेतत्वावर घ्यायची आहे, अशी बतावणी चोरट्याने केली.
त्यानंतर चोरट्याने सदनिकेचे छायाचित्र पाठविण्यास सांगितले. सदनिका व्यवहारातील पैसे ऑनलाइन पाठवितो, अशी बतावणी त्याने केली. लोणकर यांच्या आईने याबाबतची माहिती लोणकर यांना दिली.
लोणकर यांना अॅपद्वारे खात्यावर एक रुपया पाठविण्यास चोरट्याने सांगितले. त्यानंतर चोरट्याने लोणकर यांच खात्यातून दोनवेळा ऑनलाइन व्यवहार करून प्रत्येकी २५ हजार रुपये लांबविले. लोणकर यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर माहिती-तंत्रज्ञान कायद्याान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे तपास करत आहेत.