पुणे – सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयेजा सिटी नाल्यालगतचा फ्लड सेंन्सर चोरीला गेला आहे. मागील दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे नाला ओसंडून वहात आहे. असे असतानाही फ्लड सेंन्सर न वाजल्याने नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.
या ठिकाणी 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात एक महिला स्कुटरवह वाहून गेली होती. नदी व नाल्यावरील पुलांवर महापालिकेने फ्लड सेंन्सर बसवले आहेत. मात्र मागील एक दोन वर्षात अनेक ठिकाणचे फ्लड सेंन्सर चोरीला गेले आहे. यासंदर्भात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
सिंहगड पोलीस ठाण्यातही 70 हजाराचा फ्लड सेंन्सर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वहात आहेत. यामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांच्या जीवाला धोका आहे. अशातच फ्लड सेंन्सर चोरीला गेल्याचे उघडकीस आल्याने भिती आणखी वाढली आहे.