पुणे- शहरात दररोज सापडणाऱ्या नव्या करोनाबाधितांची संख्या कमी झाली असून, गेल्या 24 तासांत 158 बाधितांची नोंद झाली आहे. तसेच 172 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत शहरातील तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे; तर पुण्याबाहेरील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत शहरात एकूण 9 हजार 25 जणांचा मृत्यू झाला आहे.सक्रीय बाधितांची संख्या सध्या 1 हजार 396 आहे. त्यातील 183 जणांची प्रकृती गंभीर असून, अन्य 212 जण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात 5 हजार 901 संशयितांची स्वॅबटेस्ट केल्या आहेत.