पुणे/सहकार नगर: पुणे शहरात हॉट स्पॉट असलेल्या भवानी पेठ व पर्वती दर्शन भागात करोना संसर्गजन्य रुग्णांची संख्या वाढत असून सदर भागात झोपडपट्टी भागात अनेकांना संसर्ग होण्याचे कारण हे पत्त्यांचे डाव असल्याचे समोर आले आहे.
पर्वती दर्शन भागात करोना पॉसिटीव्ह असलेल्या रुग्णाने लॉक डाऊन काळात नियम तोडत मित्रांन सोबत पत्त्यांचे डाव खेळले सदर पॉसिटीव्ह रुग्णां सोबत पत्ते खेळत असणाऱ्यांन मध्ये बहुतांशी जण करोना पॉसिटीव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
भवानी पेठेत सुद्धा लॉक डाऊन काळात एकत्र पत्त्यांचे डाव खेळणारे जवळपास सर्वच युवकांची करोना चाचणी रिपोर्ट पॉसिटीव्ह आला असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.
वेळ घालविण्यासाठी तासन तास सोबत बसून पत्ते खेळण्याची सवय जिवावर उठत असून झोपडपट्टी भागात लॉक डाऊन काळात वेळ घालविण्यासाठी अनेक जण पत्ते खेळण्याची हौस पूर्ण करण्यास एकत्र येत आहेत सदर घटनेतून बोध घेत नागरिकांनी सदर पत्ते खेळण्याचे प्रकार तातडीने बंद करणे गरजेचे आहे. याबाबत सगळीकडे जनजागृती होणे गरजेचे आहे.
पर्वती दर्शन भागात करोना संसर्गजन्य रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याचे बहुतांश कारण म्हणजे पत्त्यांचे डाव व सार्वजनिक शौचालय असल्याचे समोर आले आहे त्यामुळे झोपडपट्टी भागात नागरिकांना सूचना करत असून झोपडपट्टी भागात कार्यकर्त्यांन मार्फत लक्षही ठेवत आहोत तरी सर्वांनी नियम पाळत पत्ते खेळण्यास एकत्र येणे तातडीने बंद करावे हा धोकादायक ठरणारा खेळ बंद करावा
– रघुनाथ गौडा ,नगरसेवक