मायावतींनी लखनौमध्ये केले मतदान ; मतदानानंतर म्हणाल्या,”प्रत्येकाने मतदानासाठी घराबाहेर पडावे”

Mayawati votes । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यांतर्गत आज 8 कोटी 95 लाखांहून अधिक मतदार 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या 49 लोकसभा जागांसाठी 94732 मतदान केंद्रांवर मतदानाच अधिकार बजावणार आहेत. ओडिशा विधानसभेच्या उर्वरित 35 जागांवरही आज मतदान होत आहे.
पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत. आज महाराष्ट्रातील १३, उत्तर प्रदेशातील १४, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, ओडिशातील पाच आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात कमीत कमी (४९) जागांवर मतदान होणार आहे.
मायावतींकडून जनतेला आवाहन Mayawati votes ।
लखनऊमध्ये मतदान केल्यानंतर मायावती म्हणाल्या की, “मी प्रत्येकाला घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करते. मी सर्व राजकीय पक्षांना विनंती करते की त्यांनी विकासाच्या मुद्द्यांना आणि लोककल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे. सर्व पक्ष, मग ते भाजप असो वा काँग्रेस. या सर्वांचे म्हणणे आहे की ते सरकार स्थापन करत आहेत पण निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल.” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
#WATCH | BSP chief Mayawati says “I appeal to everyone to come out and cast their votes…I request all political parties to prioritise the issues of development and the welfare of the people. Whether it is the BJP or Congress, all the parties say that they are forming the Govt… pic.twitter.com/qI4WqGVveu
— ANI (@ANI) May 20, 2024
पाचव्या टप्प्यात ८ राज्यात मतदान Mayawati votes ।
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहार, जम्मू-काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये आज मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात 9 लाख 47 हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. साधारणपणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होईल. पाचव्या टप्प्यात एकूण 8 कोटी 95 लाखांहून अधिक मतदार आहेत. यामध्ये 5409 मतदार हे तृतीय लिंगाचे आहेत. यामध्ये 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे 24 हजार 792 मतदार आहेत, तर 85 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे 7 लाख 81 हजार मतदार आहेत. सात लाख तीन हजार मतदार दिव्यांग मतदार आहेत.





