पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे बुधवारी 197 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लस उपलब्ध असणार आहेत. कोविशिल्डचे 186 केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोव्हॅक्सिनचे 11 केंद्रांवर प्रत्येकी 500 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ज्यांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 10 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे. त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 10 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दि. 20 जुलैपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना जी लस मिळणार आहे, त्याचे ऑनलाइन बुकिंग 40 टक्के, तर 40 टक्के ऑन दी स्पॉट बुकिंग होणार आहे. 15 सप्टेंबरला कोवॅक्सिनचा घेणाऱ्यांना दुसरा डोस 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर 40 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.