पुणे- शहरात दिवसभरात 115 करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, 169 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, शहरात करोनाने आजपर्यंत 9 हजार 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत शहरात मृत पावलेल्या 2 जणांचा समावेश असून, याशिवाय हद्दिबाहेरील
3 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
एकूण बाधितांमधील 1 हजार 291 बाधित सक्रिय असून, त्यातील 186 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 219 जण ऑक्सिजनवर आहेत.