पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे बुधवारी 198 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कोविशिल्डचे 187 केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोव्हॅक्सीनचे 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 10 टक्के आहे, तर कोव्हॅक्सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे. त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 10 टक्केऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.