पुणे – ओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याचा आरोप पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. या निलंबनाच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, अर्चना पाटील, गणेश घोष, राजेश येनपुरे, योगेश पिंगळे, प्रमोद कोंढरे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.