पुणे/सहकारनगर -करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्क 50 टक्क्यांनी कपात केली पाहिजे, या मागणीसाठी पुण्यातील बहुतांश विद्यार्थी संघटना, राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
महात्मा फुले मंडई लोकमान्य टिळक पुतळा येथून शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. करोनाच्या संकटात पालक असताना शैक्षणिक संस्थांनी शुल्कासाठी तगादा लावला जात आहे. शुल्क न भरल्याने ऑनलाइन शिक्षण बंद केले जात आहे. या सर्व प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी व शुल्क कपात करावी, यासाठी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी वंदे मातरम् संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे, वैभव वाघ, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, आर.पी.आय. विद्यार्थी आघाडी राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, रिपाइंचे शहराध्यक्ष रमेश मोरे, सुशील सर्वगोड, महाराष्ट्र नागरिक कृती समितीचे सुरेश जैन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अजिंक्य पालकर, कॉंग्रेस पक्षाचे अभिजित महामुनी, अजित जाधव, फय्याज शेख, योगेश भोकरे, बबलु कोळी, भाजपचे शैलेश बडदे, प्रकाश बाफना, मनसेचे ललित तिडे, अनिल पवार संतोष चव्हाण, आश्विन कडोले आदी उपस्थित होते.