पुणे – मागील दोन महिन्यांत ग्रामीण भागातील बाधित दरामध्ये 24 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे आज ग्रामीणमधील बाधित दर 7.3 टक्के इतका आहे. मात्र, जूनमध्ये हा घटता बाधित दराचा वेग मंदावला असून, शहराप्रमाणेच ग्रामीणमधील बाधित दर 5 टक्क्यांच्या आत आणण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
फेब्रुवारी 2021 मध्ये करोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यावेळी एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यात दररोजची बाधित संख्या 10 हजाराच्या पुढे गेली होती. त्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. मेमध्ये ग्रामीणमधील बाधित दर 31 टक्के इतका होता.
शहरातील दररोजची बाधित संख्या तब्बल दोनशे ते तीनशेपर्यंत खाली आली. मात्र, ग्रामीणमध्ये मे अखेरपर्यंत चार ते साडेचार हजारापर्यंत पोहोचलेली दैनंदिन बाधित संख्येत किंचीत घट झाली. जूनमध्ये ही संख्या हळूहळू कमी झाल्यामुळे बाधित संख्येत तब्बल 20 टक्क्यांनी घट झाली. मात्र, सध्या बाधित दर 7 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान आहे.