सांगली : कोरोना महामारीच्या संकटाने देशात हाहाकार माजवला असून कोरोनाने अनेकांना फारच वाईट दिवस दाखवले आहेत. कुटुंबातील कर्तीसवरती माणसे डोळय़ादेखत निघून जात आहेत. तर माता-पिता, भाऊ-बहीण असे सामुदायिक मृत्यू होत असल्याने हसत्या-खेळत्या कुटुंबांवर स्मशानकळा येताना दिसून येत आहेत. सांगतील अशीच हृदयाचे ठोके वाढविणारी घटना समोर आली आहे. झिमुर कुटुंबातील एकाच दिवसात आई-वडील व मुलागा यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिरशी तालुका शिराळा येथील झिमुर कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाली होती. त्याच्यांवर पुण्यात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे 5 वाजता वडील, तर संध्याकाळी 5 वाजता आई आणि त्यानंतर सहा वाजता मुलगा असे एकाच दिवसात कुटुंब उध्वस्त झाले. आठ दिवसांपूर्वी याच कुटुंबातील चुलत भावाचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला होता. या घटनेने शिरशी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
झिमुर कुटुंबातील आई-वडील हे गेली १५ वर्षापूर्वी मुंबईहून शिरशी गावात आले होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मुलीचे लग्न झाले असून मुलगा मुंबई येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मात्र आई आजारी असल्याकारणाने तो १५ दिवसांपूर्वी आपल्या गावी आला यावेळी यासर्वांना कोरोनाची लागण झाली. एकाच वेळी यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असताना सकाळी वडीलांची प्राणज्याेत मालावली या दु:खातून सावरत नाही तर संध्याकाळी आईने निरोप घेतला. आणि काही वेळातच मुलाचाही मृत्यू झाला. असे १३ तासात अख्ख कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे.