पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची 2022-23 ची वार्षिक निवडणूक लवकरच होणार आहे. याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक संकपाळ यांची निवड झाली आहे. तर, अतिरिक्त निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अजय पटवर्धन काम पाहणार आहेत.
सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. फक्कडराव साकोरे, ॲड.मंगेश लेंडघर, ॲड.नमिता पाटील, ॲड. पूनम स्वामी, ॲड.पूजा भोसले यांची निवड झाली आहे.
पुणे बार असोसिएशनच्या मॅनेजिंग कमिटीने रितसर ठराव मंजूर करून ही निवडणूक कार्यकारिणी जाहीर केली आहे. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सतीश मुळीक यांनी याबाबतची माहिती दिली. सचिव ॲड. विकास बाबर यावेळी उपस्थित होते.
ॲड. संकपाळ हे श्री मार्तड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त असून, दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी पूर्वी काम केले आहे. करोनामुळे मागील वर्षी निवडणूक होऊ शकली नाही. यावेळी होणार आहे.