पुणे : पुण्यातील अल्का टॉकीज चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचे विद्यार्थी अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलनाला सुरुवात झाली आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकरही सहभागी झाले आहेत. सध्याचं राज्य सरकार लवकरच या प्रश्नी तोडगा काढेल, असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केला आहे.
यावेळी डिजिटल प्रभातचे रिपोर्टर प्रीतम पुरोहित यांनी उपस्थित विद्यार्थांशी संवाद साधला. एमपीएससीच्या अभ्यासक्रम अचानक बदललेल्यामुळे अभ्यास कसा करायचा हा प्रश्न सर्व विद्यार्थांन पुढे येतोय. आम्हाला न्याय द्या. असं म्हणत विद्यार्थांनी मागणी केली आहे की हा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करा.