पुणे :- पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा शुक्रवारी (दि.15) नियमितपणे सुरू राहणार आहेत. यांची सर्व मुख्याध्यापक, मनपा व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी याची नोंद घ्यावी, असे पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बुधवारी(दि.13) पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यामुळे गुरुवारी(दि.15) शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.