पुणे – झाडाखाली चहा पीत उभा असलेल्या तरुणाच्या डोक्यात फांदी पडून मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळी घडली. (pune news)
अभिजित गुंड (३२, रा .कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. गुंड हा तरुण सायंकाळी चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आला होता. त्यावेळी वरून झाडाची फांदी कोसळली. ही फांदी गुंड याच्या डोक्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.
येथील नागरिकांनी तात्काळ रिक्षामधून त्याला रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.