पुणे – 60 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीत अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत 60 हजार 247 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.

विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत दाखल झालेल्या अर्जांपैकी 21 हजार 967 अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. 21 हजार 483 अर्जांची स्वयंचलित तपासणीही करण्यात आली आहे. 16 हजार 797 अर्जांची अद्याप तपासणी झालेली नाही, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रासाठी राज्यात सर्वात जास्त अर्ज दाखल झाले आहेत. 97 हजार 154 अर्ज दाखल झाले असून यातील 17 हजार 844 अर्जांची तपासणी करण्यात आली आहे. 52 हजार 978 अर्जांची तपासणी झालेली नाही. 26 हजार 332 अर्जांची अद्याप तपासणी झालेली नाही. नाशिकमध्ये 16 हजार 938 अर्ज दाखल झाले आहेत. यातील 8 हजार 566 अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली असून 2 हजार 785 संगणक प्रणालीद्वारे आपोआप तपासणी करण्यात आली आहे. 5 हजार 587 अर्जांची तपासणी होणे अद्याप बाकी आहे. नागपूर विभागात 13 हजार 173 अर्ज भरण्यात आले असून यातील 6 हजार 949 अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. 1 हजार 449 अर्जांची पडताळणी स्वयंचलित झाली असून अद्यापही 4 हजार 775 अर्जांची पडताळणी होणे बाकी आहे. अमरावती विभागात 1 हजार 110 अर्ज दाखल झाले आहेत. यात 547 अर्जांची तपासणी झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.