पुणे – 1,500 फायली बिलांसाठी दाखल

“फाइल क्‍लिअर’ करण्याचा पालिकेचा विक्रम

पुणे – केवळ पैसे भरण्यासाठीच नव्हे, तर बिलांसाठीही महापालिकेच्या वित्त आणि लेखापरीक्षण विभागात सुमारे 1,500 फायली दाखल झाल्या आहेत. संपूर्ण वर्षांत 1,500 विकास कामे पूर्ण झाली असून, त्याची बिले अदा करण्यासाठी या फायली “क्‍लिअर’ करून त्याची बिले अदा करण्याचा विक्रम महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने केला आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमार्फत वर्षभर ठेकेदारांमार्फत विविध विकासकामे करून घेतली जातात. यासोबतच क्षेत्रीय कार्यालयाकडूनही ठेकेदारांमार्फत कामे केली जातात. एरव्ही पाच-साडेपाचच्या ठेक्‍याला घराकडे निघणारे अधिकारी आणि कर्मचारी पहाटेपर्यंत काम करीत असल्याचे दिसून आले. यंदा दि.31 मार्च रोजी रविवार आल्याने शनिवारी दि.30 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत होते. त्यामुळे ठेकेदारांची बिले काढून घेण्यासाठी लगबग सुरू होती. दिवसभर सुरू असलेली लगबग रात्री सुमारे साडेबारा ते एकपर्यंत सुरू होती.

महापालिकेच्या लेखा परिक्षण विभागामध्ये एकाच दिवसात शेकडो फाईल्सचा गठ्ठा येऊन पडलेला होता. त्यातून दीड हजार फायली निरस्त करणे प्रत्यक्षात मोठे काम असल्याने अधिकाऱ्यांना त्यासाठी जादाचे सहा ते सात तास द्यावे लागले. मात्र, एकाच रात्रीत “जादूची कांडी’ फिरली आणि शहरातील जवळपास हजार-दीड हजार कामे एकाच दिवसात पूर्ण झाल्याचा “चमत्कार’ कसा झाला, याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा सुरू होती.

प्रशासन म्हणते…
ठेकेदारांनी कामे पूर्ण केली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात आली की नाही, याविषयी चर्चा आहे. मात्र कामे पूर्ण झाली आहेत की नाही, हे पाहण्याचे काम संबंधित विभागाचे आहे. विभाग प्रमुखाने फायलींवर स्वाक्षरी केल्यानंतर बिले काढली जातात असा खुलासा विभागातर्फे देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.