पुणे – राज्यात जेएन-१ व्हेरियंटचे रुग्णांची संख्या सर्वाधिक पुण्यात आढळली आहे. पुण्यात तब्बल १५० रुग्ण झाले आहे. त्यामुळे जेएन-१ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या १३९ वरुन २५० वर पोहोचली आहे. यामध्ये राज्यात पुण्यानंतर नागपूरमध्ये ३० तर मुंबईमध्ये २२ रुग्ण आढळले आहेत.
जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालानुसार १ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२३ च्या दरम्यान आढळलेल्या आर.टी.पी.सी.आर कोविड पॉझिटीव्ह रुग्णाचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. यामध्ये नवीन १११ रुग्णांमध्ये जेएन-१ व्हेरियंट आढळून आला आहे. सध्या राज्यात जेएन-१ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या २५० पर्यंत गेली आहे.
राज्यात जेएन-१ व्हेरियंट रुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात १५० आहे. त्याखालोखाल नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, ठाणे ७, जळगाव ४, आहमदनगर ३, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, नांदेड २, कोल्हापूर २, धाराशिव २, नाशिक २, आकोला १, रत्नागिरी १, सिंधुदर्ग १, सातारा १, यवतमाळ १ असे एकूण २५० रुग्णसंख्या झाली आहे.