हरीद्वार – सिंघूसागर आणि यती नरसिंहानंद यांच्यावर काल गुन्हा नोंदवल्यानंतर हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत मुस्लिम समाजाविरोधात द्वेषमुलक वक्तव्यानंतर 10 व्यक्तींविरोधात दुसरी एफआयआर नोंदवण्यात आली.
हरिद्वारमधील जवळपूर पोलीस ठाण्यात नदीम अली यांनी नोंदवलेल्या फिर्यादीवरून ही एफआयआर नोंदवण्यात आली. त्यानंतर त्याचे पत्र शहर पोलिसांना देण्यात आले. तेथे त्यांच्यावर पहिली एफआयआर नोंदवण्यात आल्याचे पोलीश उपनिरीक्षक नीरेश शर्मा यांनी दिली.
दुसऱ्या एफआयआरमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेले यती नरसिंहानंद, जितेंद्र नारायण त्यागी उर्फ वसीम राझवी, सिंघू सागर, धर्मदास, परमानंद, साध्वी अन्नपूर्णा, आनंद स्वरूप, अश्विनी उपाध्याय, सुरेश चहवान आणि प्रबोधानंद गिरी अशी आरोपींची नावे आहेत.
16 ते 19 डिसेंबर दरम्यान हरिद्वारमध्ये झालेल्या या धर्म संसदेतील मुस्लीम समाजावर करणाऱ्या भाषणांमुळे सरकारवर प्रचंड दबाव येत आहे. यात मुस्लीमांविरोधातील हिंसाचारास उद्यूक्त करणारी भाषणे करणाऱ्यांवर कारवाईसाठी मुस्लीम समाजाने शुक्रवारी आणि शनिवारी मोर्चे काढले होते.