देहूरोड, (वार्ताहर) – निर्भय सभेसाठी निघालेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वभंर चौधरी, असीम सरोदे आणि महिलांवर भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून करत हल्ला केला. त्याचा देहूरोड महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी येथील ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकात कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून जाहीर निषेध केला.
शिवसेनेचे रमेश जाधव, विशाल दांगट, काँग्रेसचे हाजीमलंग मारीमुत्तू, रफिक शेख, गफूर शेख, राष्ट्रवादीचे मिक्की कोचर आदींनी भाजपाचे निषेध करीत संताप व्यक्त केला. शिवसेना देहूरोड शहर अध्यक्ष भरत नायडू, मेहेरबान सिंग, शशिकांत सप्पागुरू, देवा कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) सचिन भुंबक, सुरेश भास्कर, गोविंद राऊत, रेणू रेड्डी, शिवाजी दाभोळे, अंथॉनी स्वामी, दीपक कसबे, अक्षय टाक, आकाश भुंबक, सुरेश सातकर, रोहित झेंडे, काँग्रेसचे व्यंकटेश कोळी, जलाल शेख, बबन टोम्पे, आकाश राजलींगम, संभाजी पिंजण, गौतम शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.