पुणे – समाजात वेश्या व्यवसायामुळे संतुलन राखलं जात आहे. वेश्या व्यवसाय हा पुरातन काळापासून आहे. समाजाचं संतुलन राखण्याचं काम होते. त्यामुळे या वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारायला हवं, असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबीरासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, जर्मनीमधे वैश्याव्यवसायाकडे आदराने बघितले जाते. हे काम करताना तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे. तुम्ही जे काम करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहेत. पैशासाठी आणि गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील अभिमानास्पद काम करत आहात, अशा शब्दांत अमृता फडणवीस उपस्थित महिलांना पाठिंबा दर्शवला.
दरम्यान तुमच्यावर काही वाईट प्रसंग आला तर तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा, मी तुमच्या पाठिशी उभी राहिलं, अस आश्वासन त्यांनी महिलांना दिलं.