संसद अधिवेशन कालावधी वाढवण्याचा प्रस्ताव विरोधकांना अमान्य

नवी दिल्ली – संसदेच्या चालू अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला विरोधकांनी नकार दिला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यावेळी या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा इरादा आहे असे सरकारतर्फे सदस्यांना सांगण्यात आले. दहा महत्वाची विधेयक अजून प्रलंबीत असून अजूनही काही महत्वाचे कामकाज बाकी असल्याने हा कालावधी वाढवण्याचा सरकारचा इरादा आहे असे सभापती बिर्ला यांनी सांगितले.

तथापी चालू अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास आमचा सक्त विरोध आहे असे विरोधी सदस्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या मंत्र्यांना स्पष्ट केले. संसद अधिवेशनाचा चालू कालावधी 26 जुलैपर्यंत आहे पण तो 2 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा सरकारचा इरादा आहे. या अधिवेशनाची प्रॉडक्‍टीव्हींटी 128 टक्के इतकी असल्याने सरकारचा उत्साह वाढला असून त्यांनी त्याच आधारावर उर्वरीत कामकाज निपटण्यासाठी अधिवेशनाची मुदत वाढ मागवली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)