सातारा – करंजे तर्फ सातारा येथील कोटेश्वर पाण्याच्या टाकीच्या बाजूला असणाऱ्या गृह संकुलाच्या दरवाजाचे कुलूप अज्ञाताने तोडून तेथील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा दोन लाख 42 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हातोहात गायब केला.
ही घटना दि. 24 जून रोजी सायंकाळी पाच ते दि. 28 जून रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडल्याचा संशय आहे. याप्रकरणी उमेश राम पिंगळे (वय 65, रा. स्वामी गृहसंकुल, बोधे हॉस्पिटलजवळ करंजे) यांनी फिर्याद दिली आहे. पिंगळे डॉक्टर काही कामानिमित्त साताऱ्याच्या बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप कापून आत प्रवेश केला.
दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम मधील गोदरेजच्या लॉकर मधील 62 हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, त्यामध्ये असलेले काळेमणी, दोन वाट्या असलेले मंगळसूत्र, एकतीस हजार रुपये किमतीचे डायमंड, कानातील कर्णफुले,16 हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन छल्ले, 19500 रुपये किमतीचा चांदीचा मेखला, चांदीचे बिस्किट आणि 62 हजार रुपये रोख, चाळीस हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा डिजीटल कॅमेरा, पाच हजार रुपये किमतीचे गोदरेज कंपनीचे डिजीटल लॉकर असा दोन लाख 42 हजार रुपये 600 रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवला. महिला पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करत आहेत.