Gujarat Giants vs Jaipur Pink Panthers, Pro Kabaddi League 2024 (Panchkula) :- प्रो-कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमातील साखळी फेरीतील सामन्यात सेमवारी जयपुर पिंक पॅंथर्स संघाने आपला विजयी धडाका कायम राखला. जयपुर संघाने या सामन्यात गुजरात जायंट्स संघावर 45 विरुद्ध 36 अशी मात केली. या विजयासह जयपूर संघ 92 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे आणि गुजरात जायंट्स 70 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
जयपूर पिंक पँथर्ससाठी PKL 2023-24 च्या या सामन्यात, चढाईत अर्जुन देशवालने सुपर 10 लगावत 13 रेड पॉइंट घेतले आणि बचावात, साहुल कुमार (6) आणि सुमितने उच्च 5 गुण घेतले. गुजरात जायंट्ससाठी चढाई करताना, प्रतीक दहियाने सुपर 10 लगावत जास्तीत जास्त 14 रेड पॉइंट घेतले आणि बचावात, जितेंद्र आणि दीपकने 3-3 टॅकल पॉइंट घेतले.
Top-2 confirmed ✅
Finish league stage in style ✅The defending champions picked up a 9️⃣-point victory over the Giants to kickstart Monday night’s action 🤌#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL10 #PKL #HarSaansMeinKabaddi #GGvJPP #GujaratGiants #JaipurPinkPanthers pic.twitter.com/BvZ2dCD1xH
— ProKabaddi (@ProKabaddi) February 19, 2024
पहिले सत्र सुरु झाल्यापासून जयपुर संघाने सामन्यावर नियंत्रण मिळवले व ते सत्र संपेपर्यंत आपल्याच हाती राखले. जयपुरचा स्टार खेळाडू अर्जुन देशवालने गुजरातच्या खेळाडूंवर असे दडपण आणले होते की पकडी कशा करायच्या हेच ते विसरले. त्याना रेड गुणही जास्त मिळवता आले नाहीत. अर्जुनला सुमीतने तोलामोलाची साथ दिली. त्याने बचाव इतका अभेद्द केला होता की गुजरातच्या खेळाडूंना तो भेदताच येत नव्हता. पहिल्या सत्रात जयपुरने तब्बल १० गुणांची आघाडी घेतली होती.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर गुजरातने कडवी लढत द्यायला सुरुवात केली होती. त्यांचा प्रतिक दहिया व दीपक सिंग यांनी रेड गुण पटकावताना जयपुरच्या खेळाडूंविरुद्ध एकदा बोनस गुणही मिळवत आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, काही वेळातच जयपुरची गाडी रुळावर आली व त्यांनी गुणांची चाळीशीही पार केली. पुन्ह एकदा सामना जयपुरकडे झुकला. मात्र, सामन्यात गुजरातच्या दीपक सिंगने पुन्हा एकदा रंगत आणली व गुणांमध्ये वाढ करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला.
#PKLSeason10 ( #CHEvBEN Match 126 ) : बंगाल वॉरियर्सचा दारूण पराभव….
यावेळी जयपुरकडे केवळ ९ गुणांची आघाडी होती. जयपुरचा देशवाल व गुजरातचा प्रतिक यांच्यात रंगलेली चुरस अफलातून होती. मात्र, अखेर जयपुरने अनुभवाच्या जोरावर हा सामना जिंकला आणि बाद फेरीतील अव्वलस्थानाकडे कूच केली.