‘डोळे फुटलेत का तुझे ? …’ BJP उमेदवार कपिल पाटलांनी मतदान केंद्रावर पोलिसांवरच केली दादागिरी

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी देशातील ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर इव्हीम मशीन बंद झाल्याची माहिती आणि व्हिडिओ समोर आले. अशात मुंबईतील भिवंडी परिसरातील मतदान केंद्रावरील एक व्हिडिओ समोर आला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत भिवंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील दिसत आहे. या व्हिडिओ ते अरेरावी करत आहे. कपिल पाटील हे पोलीस अधिकाऱ्यांना अपशब्द वापरताना दिसत आहेत. त्यामुळे आता कपिल पाटलांवर जोरदार टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कपिल पाटील हे खंडूपाडा बाला कंपाऊड मिल्लत नगर येथील अल्पसंख्याक बहुल असलेल्या मतदान केंद्रावर दाखल झाले होते.यादरम्यान मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला होता. याच घटनेवरून कपिल पाटील प्रचंड चिडले होते. त्यांनी पुढे मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
अशात कपिल पाटील यावेळी दमदाटी करत असताना त्यांच्या तोंडून अपशब्द देखील बाहेर पडले होते. व्हायरल व्हिडिओत मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना इतर ठिकाणी का गर्दी आहे? असा दम देत, तेथील आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना दादागिरीच्या भाषेत ‘डोळे फुटलेत का तुझे भ&@# तिकडे काय &@#** मारतो का?’ असे बेताल वक्तव्य करताना दिसत व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओवर संताप व्यक्त केला जात आहे.





