ग्वाल्हेर – मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सध्या ग्वाल्हेर हे राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. यामुळेच 21 जुलै रोजी प्रियांका गांधी निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यासाठी येत आहेत. सिंदियांचा बालेकिल्ला असलेल्या ग्वाल्हेरमध्ये प्रियंका गांधी सर्वप्रथम वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीवर पोहोचून त्यांना पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर निवडणुकीचा प्रचार सुरू होईल. वीर राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीला गांधी कुटुंबातील सदस्य भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेश ते दिल्लीपर्यंतचे मोठे नेते प्रियांका गांधींच्या दौऱ्यासाठी सिंदियांचा बालेकिल्ला ग्वाल्हेरमध्ये तळ ठोकून आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक बडे नेते दिवसभर बैठका घेत आहेत. प्रियांका गांधी 21 जुलैला ग्वाल्हेरला येणार आहेत. यादरम्यान त्या शहरातील जत्रा मैदानावर मोठ्या सभेला संबोधित करतील. त्यासाठी एक लाखाहून अधिक नागरिक येतील असा अंदाज आहे.
प्रियंका गांधी यांचे राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीवर पोहोचणे सर्वाधिक चर्चेत आहे. पहिल्यांदाच गांधी घराण्यातील सदस्य लक्ष्मीबाईंच्या समाधीवर पोहोचल्याचे पाहायला मिळणार आहे. याबाबत कॉंग्रेसचे म्हणणे आहे की, प्रियांका गांधी लक्ष्मीबाईंचे आशीर्वाद घेण्यासाठी समाधीस्थळावर पोहोचून ज्योतिरादित्य सिंदिया यांना त्यांच्या इतिहासाची आठवण करून देतील.