प्रियंका गांधींना पुन्हा पोलिसांनी रोखले

लखनौ  – पोलिसांच्या कोठडीत मरण पावलेल्या एका आरोपीच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी निघाल्या असता त्यांना पोलिसांनी तिकडे जाण्यापासून रोखले आहे. त्यांच्याकडे या नातेवाइकांना भेटण्यासाठीची अनुमती नसल्याने त्यांना रोखण्यात आल्याचा मासलेवाईक खुलासा पोलिसांनी केला आहे.

याच महिन्याच्या सुरुवातीला लखीमपूरच्या घटनेत ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी तिकडे निघाल्या होत्या. त्यावेळीही त्यांना पोलिसांनी रोखले होते व त्यांना नंतर या प्रकरणात अटकही करण्यात आली होती.

आज प्रियंका गांधी ज्या अरुण नावाच्या मृत इसमाच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या त्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. त्याच्यावर पैसे चोरल्याचा आरोप होता. पोलिसांच्या मारहाणीत या इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.