नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधा दरम्यान अटक करण्यात आलेल्या कार्यकर्ते सदफ जफरच्या घरी यांच्या जाण्यापासून प्रियांका गांधींना पोलिसांनी रोखले आहे.
सदफ जफरला गेल्या आठवड्यात पोलिसांनी लखनऊमध्ये अटक करून. त्यांना तुरूंगात पाठविले होते. आज प्रियंका गांधी त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांची गाडी रस्त्यात अडवली आहे.
दरम्यान पोलिसांनी गाडी थांबवल्यावर प्रियांका गांधी पायी जात आहेत. कॉंग्रेस नेत्या आणि अभिनेत्री सदफ जफर यांना गेल्या आठवड्यात पोलिसांनी लाइव्ह फेसबुक करीत असताना अटक केली होती.
त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप परिवाराने केला आहे. पोलिसांनी सदफ जफर यांच्यावर गंभीर कालमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना लखनऊच्या हजरतगंज तुरूंगात बंद करण्यात आले आहे.