श्रीनगर – जम्मू आणि काश्मीर पोलिसांना आज दहशतवादी असल्याचा बनाव रचत नागरिकांना व ट्रक चालकांना लुटणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात यश आलं आहे. याबाबत सविस्तर असं की जम्मू आणि काश्मीर येथील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना, प्रवाशांना व ट्रकचालकांना खेळण्यातील पिस्तूल व बनावट एके ४७चा धाक दाखवून दहशवादी असल्याचा बनाव रचत लुटणारी एक टोळी कार्यरत होती. याबाबत जम्मू आणि काश्मीर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर टोळीचा मागोवा काढत त्यांना जेरबंद केले.
या कारवाईबाबत श्रीनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. हसीब मुघल यांनी माहिती देताना सांगितले की, “सदर टोळीतील ३ जणांना जेरबंद करण्यामध्ये आम्हाला यश आलं असून सदर आरोपी खेळण्यातील बंदुका व बनावट एके ४७ बंदुकीचा धाक दाखवत आपण दहशतवादी असल्याचा बनाव रचत व ट्रक चालकांना लुटत असत. सदर टोळीकडून बनावट पिस्तूल व नकली एके ४७ बंदूक जप्त करण्यात आली आहे.”
Jammu and Kashmir: Police arrested 3 persons who pretended to be terrorists&looted people.Toy pistols& dummy AK-47 were recovered from their possession.Dr. Haseeb Mughal,SSP Srinagar says,”accused pretended to be militants&looted truck drivers on gunpoint. Further probe underway” pic.twitter.com/NCAiW5VbV6
— ANI (@ANI) December 28, 2019