जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठासह देशभरात नागरिकत्व सुधार कायद्याच्या विरोधात निर्देर्शने होत आहेत.
अशा परिस्थितीवर नियंत्रणात मिळवण्यासाठी पोलिसांनी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या कायद्याबद्दल आपली मते मांडत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राने या विषयावर एक ट्विट केले आहे. जे सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.
— PRIYANKA (@priyankachopra) December 18, 2019
प्रियंका चोप्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये विद्यार्थ्यांचा उल्लेख करत लिहिले की, ‘प्रत्येक मुलाचे शिक्षण हे आपले स्वप्न आहे. शिक्षण त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्यास सक्षम करते. स्वतंत्र लोकशाहीमध्ये शांततेत आवाज उठवणे आणि हिंसाचार करणे चुकीचे आहे. हा प्रत्येक आवाज भारत परिवर्तनासाठी कार्य करेल असे त्यांनी ट्विट केले आहे.