मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिज मुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान हटके लुक केला होता. ज्यात ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. प्रियांकाचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
प्रियांकाने इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. फोटोमधील प्रियांकाच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या फोटोला ‘Citadel has arrived in London…’ असं कॅप्शन प्रियांकाने दिले आहे. सध्या तिच्या फोटोवर चाहत्यांच्या लाईक आणि कमेन्टसचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
सिटाडेल ही एक स्पाय स्टोरी आहे ज्यामध्ये प्रियंका स्वतः एक गुप्तहेर आहे. त्याच्यासोबत रिचर्ड मॅडन मुख्य भूमिकेत आहे. स्टॅनली टुसी आणि लेस्ली मॅनव्हिल देखील यात आहेत. त्यांचे कॅरेक्टर लूक्सही रिलीज करण्यात आले आहेत. सिटाडेल ही प्रियांकाची दुसरी हॉलिवूड सिरीज आहे, ज्यात ती एका गुप्तहेराची भूमिका करताना दिसणार आहे. याआधी प्रियांकाने ‘क्वांटिको’मध्ये अशीच भूमिका साकारली आहे. ‘सिटाडेल’ ही सिरीज 28 एप्रिलला ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.