बॉलीवूड सेलिब्रीटींसाठी सोशल मीडिया हे माध्यम आता महत्त्वपूर्ण मानले जात. व्यक्तिगत तसेच व्यावसायिकदृष्टया त्यांना अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचता येते.
View this post on Instagram
इंस्टाग्रामने नुकतीच यंदाची रिच लिस्ट 2021 जाहीर केली आहे. या यादीत 2 भारतीय व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने बाजी मारली आहे.
View this post on Instagram
बॉलीवूडची देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. प्रियांका अनेक ब्रॅन्डचे फोटोज, व्हिडिओ सतत पोस्ट करत असते. इंस्टग्रामवर प्रियांकाचे तब्बल 65 मिलियन फॉलोअवर्स आहेत. तसेच प्रियांकाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.
View this post on Instagram
इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 नुसार प्रियांका तिच्या प्रत्येकी एका पोस्टसाठी कोट्यवधींचे मानधन घेते. प्रियांका इंस्टाग्रामच्या एका पोस्टसाठी जवळ-जवळ 3 कोटी रुपये चार्ज करते. प्रियांकाने गतवर्षी तब्बल 271,000 डॉलरची कमाई केली होती.
View this post on Instagram
या लिस्टमधील प्रथम क्रमांक पटकवणारा सेलिब्रिटी फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो हा ठरला आहे. रोनाल्डो एका पोस्टद्वारे 11.9 कोटी रुपये कमवतो.