मुंबई- अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. दोघांचे अनेक फोटो दोघे शेअर करत असतात. त्यांचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. त्यांच्यासाठी कायम नवनवीन पोझमधील फोटो ते शेअर करत असतात.
मात्र काही दिवसांपुर्वी निकने एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला. तो फोटो काही मिनिटातच व्हायरल झाला. या फोटोत ते तिघेही आहे. मात्र निक आणि प्रियांका लिपलॉक करताना या फोटोत दिसत आहे.
या आधी त्यांनी बरेच फोटो शेअर केले आहेत मात्र असा फोटो पहिल्यांदाच शेअर केला आहे. चाहतावर्ग मोठा असल्याने हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.
यांनी २०१८ ला जोधपूरच्या उम्मेद पॅलसमध्ये लग्न केलं. त्यांचा लग्नसमारंभ खूप दिवस चालला. या जोड्याने ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने रिवाज पार पाडले. यानंतर ४ डिसेंबरला दिल्लीमध्ये व्हीव्हीआयपी, मीडिया आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन ठेवलं होतं.