नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवरून लोकसभेमधील वातावरण चांगलेच तापले आहे. 8 ऑगस्ट रोजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांना तुमची औकात नाही, असे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाकडून नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. एवढेच नाही तर, नारायण राणे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने भाजपच्या मंत्र्यांना आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी निलंबित करणार का, असा सवालही संसदेत विचारला आहे.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही राणेंच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. “हे महाशय मंत्री आहेत, यांच्या भाषणावरुन या सरकारचा दर्जा कळतो,” असे म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच, खासदार अरविंद सावंत यांनीही नारायण राणेंवर पलटवार केला. राणे लोकसभेत त्यांच्या उंचीप्रमाणे बोलले, वैचारिक उंचीप्रमाणे म्हणा हवं तर.. तसेच, भगौडे म्हंटल्यावर इतका राग का आला? मणिपूरच्या घटनेमुळे देशावर कलंक लागला आहे. आजचा लोकसभेतील विषय गंभीर होता, त्या लोकांनी तो फरफटत नेला, असे सावंत म्हणाले.
This man is a minister. Here he is seen displaying the standard of this government and how low it can go. pic.twitter.com/TMzcjpgIYT
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) August 8, 2023
दरम्यान, नारायण राणे यांनी लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना ठाकरे गटावर हल्ला केला होता. यावेळी त्यांनी सभागृहात ‘औकात’ या शब्दाचा उच्चार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही, असे नारायण राणे म्हणाले होते. यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. यावेळी सभापती राजेंद्र अग्रवाल यांनीही नारायण राणे यांना रोखण्याचा प्रयत्न करत दोन वेळा ताकीद देत खाली बसण्यासही सांगितले होते.
लोकसभेत वैचारिक उंची प्रमाणे बोलले….
भगौडे म्हंटल्यावर इतका राग का आला??
मणिपूरच्या घटनेमुळे देशावर कलंक लागलाय! आजचा लोकसभेतील विषय गंभीर होता, त्या लोकांनी तो फरफटत नेला.
निशिकांत दुबेंच भाषण अतिशय वाहियात होतं, विषयाला धरुन नव्हतं! बेबंदशाही सुरू आहे!@OfficeofUT… pic.twitter.com/gNrXXARJmT— Arvind Sawant (@AGSawant) August 8, 2023