“मेन इन ब्लॅक- इंटरनॅशनल’च्या हिंदी आवृत्तीचे ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्यासाठी सिद्धांत चतुर्वेदी आणि सान्या मल्होत्रा यांची तयारी झाली आहे. हे दोघेही “मेन इन ब्लॅक’ची हिंदी आवृत्ती असलेल्या “एमआयबी-इंटरनॅशनल’च्या हिंदी ट्रेलरमध्ये खास एजंट म्हणून दिसणार आहेत. भारतीय प्रेक्षकांसाठी हा ट्रेलर हिंदीमध्ये तयार केला आहे. तर मुख्य सिनेमा तमिळ आणि तेलगूमध्येही असणार आहे. या ट्रेलरची एक झलक सान्या मल्होत्राने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ही व्हिडीओ क्लीप दोन फ्रेममध्ये विभागलेली आहे.
सुटकेस घेतलेले दोघेजण मुंबईच्या रस्त्यांवरून सान्या आणि सिद्धांत या भारतीय एजंटांना भेटायला येतात. हे दोघेही या सूटकेस आतुरतेने उघडून बघतात. त्यानंतर सान्या आणि सिद्धांत दोघेही काळ्या सूटमध्ये आणि काळे गॉगल लावलेले दिसतात. त्यांना सांगितलेल्या ठिकाणी ते दोघेही जातात, असा हा एकदम विनोदी ट्रेलर आहे. “गली बॉय’मध्ये काम केलेल्या सिद्धांत चतुर्वेदीने “एमआयबी-इंटरनॅशनल’ने ख्रिस हॅम्सवर्थसाठी डबिंग केले आहे. तर “दंगल’ गर्ल सान्या मल्होत्राने तिसा थॉमसनच्या पात्राला आपला आवाज दिला आहे.