नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा 2020 या कार्यक्रमात 20 जानेवारी रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा तिसरा कार्यक्रम आहे. सोमवारी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये सकाळी 11 वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत तसेच काही निवडक विद्यार्थ्यांसमवेत परीक्षेच्या ताणासंबंधी चर्चा करणार आहेत.
या कार्यक्रमाविषयी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशा अनोख्या कार्यक्रमात केवळ सहभागच नाही तर पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांना उपयुक्त सल्लाही मिळणार आहे, ज्यामुळे भविष्यात दीर्घकालीन निकालासाठी विद्यार्थी तणावरहीत राहतील.
पंतप्रधानांचा पहिला संवाद कार्यक्रम शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 16 फेब्रुवारी 2018 रोजी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये, दुसरा कार्यक्रम 29 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअमध्येच झाला होता.