नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये जाऊन आईचे शेवटचे दर्शन घेतले.
पंतप्रधान मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला.
#WATCH | Gujarat: Heeraben Modi, mother of PM Modi, laid to rest in Gandhinagar. She passed away at the age of 100, today.
(Source: DD) pic.twitter.com/wqjixwB9o7
— ANI (@ANI) December 30, 2022
रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनीच पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भावासोबत मिळून आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
#WATCH | Gujarat: Last rites of Heeraben Modi, mother of PM Modi were performed in Gandhinagar. She passed away at the age of 100, today.
(Source: DD) pic.twitter.com/TYZf1yM4U3
— ANI (@ANI) December 30, 2022
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी रुग्णालयाबाहेर जमली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी गांधीनगरमधील घरी पोहोचले. आईच्या पार्थिवाचे दर्शन त्यांनी घेतले. यावेळेस मोदींच्या गांधीनगरमधील घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती.