नवीदिल्ली – पेले हे जगातील महान आणि सर्वात प्रिय फुटबॉलपटूंपैकी एक होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ ब्राझीलमध्येच नव्हे तर संपूर्ण जगात आणि संपूर्ण फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते.पेले 2021 पासून कोनल कॅन्सरवर उपचार घेत होते. काही आजारांमुळे ते गेल्या महिन्यापासून रुग्णालयात दाखल होते.अखेर त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली.
पेले हे 3 विश्वचषक जिंकणारे जगातील एकमेव फुटबॉलपटू होते. 1940 मध्ये जन्मलेल्या पेलेने वयाच्या 15 व्या वर्षी सॅंटोस क्लबसाठी आणि त्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी ब्राझीलसाठी पदार्पण केले.त्यानंतर त्यांनी संपूर्ण जगाला फुटबॉलचे धडे दिले. आपल्या कारकिर्दीत एकूण 1279 गोल करणारा महान फुटबॉलपटू पेले जगाला फुटबॉल खेळाचे महत्व पटवून गेला. 1999 मध्ये, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवले होते.
चहाच्या दुकानात काम करायचे
23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमध्ये जन्मलेले पेले कमाईसाठी चहाच्या दुकानात काम करायचे. त्यांना लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती. परंतु कुटुंबियांना फुटबॉल परवडत नव्हता. ते सहसा सॉक्समध्ये वर्तमानपत्र भरून फुटबॉल बनवून खेळत असे. सुरुवातीच्या काळात ते अनेक एमॅच्युअर संघांसोबत खेळले. पुढे त्यांनी 2 यूथ स्टेट चॅम्पियनशिपमध्ये बौरू ऍथलेटिक क्लब ज्युनियर्सचे नेतृत्व केले.
इनडोअर फुटबॉलने प्रवास सुरू झाला
पेलेचा महानतेचा प्रवास इनडोअर फुटबॉलने सुरू झाला. तो एका संघात सामील झाला आणि सामील झाल्यानंतर, त्याच्या क्षेत्रात इनडोअर फुटबॉल देखील खूप लोकप्रिय झाला. त्याच्या प्रदेशातील पहिली स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचाही तो एक भाग होता. पेले आणि त्यांच्या संघाने पहिले विजेतेपद जिंकले आणि येथून महान खेळाडू होण्याच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली.
विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण फुटबॉलपटू
वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत पेले फुटसल खेळत राहिले. यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी सॅंटोस क्लबच्या वतीने पदार्पण केले आणि फुटबॉलच्या जगात पाऊल ठेवले. एका वर्षानंतर, पेलेने ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात प्रवेश केला आणि त्याच्या प्रवेशाच्या एका वर्षानंतर, तो विश्वचषक जिंकणारा जगातील सर्वात तरुण फुटबॉलपटू बनला. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये नवं नवीन रेकॉर्ड बनवत गेला.